Friday, April 16, 2010

ऎश इन द एअर.....

ऎश इन द एअर.....

हे टायटल वाचून तुमचा गॆरसमज होईल की हे ऎश्वर्या राय बद्दल आही आहे का? ही वेगळीच ऎश आहे. गेल्या आठवड्यात आइसलंड ला व्होल्कॅनो इरप्ट झाला आणि ’ऎश इन द एअर’ अशा बातम्या पेपरात दिसू लागल्या. युरोपमधल्या फ्लाईटस कॅन्सल झाल्या आणि लोकाना हळूहळू त्याचे गांभीर्य कळू लागले. जोपर्यंत आपला त्याच्याशी संबंध येत नाही तोवर जनरली आपण ते वाचतो आणी सोडून देतो. असे बरेच उद्रेक निसर्गात होतात पण ते आपल्यापासून दूर असतात, आपला संबंध येत नाही त्याच्याशी. पूर्वी अलास्कात अशा प्रकारची बातमी वाचली होती आणि हे विमानांना हानिकारक असते असे वाचलेही होते. अलास्कात विमाने तशी कमी जातात पण आता युरोप ची सगळी हवाई यंत्रणा थंडावली म्हटल्यावर त्याची चर्चा जोरात सुरू आहे.

आपण आता कलियुगात आहोत आणि आता प्रलय होणार हे सगळीकडे आपण ऎकत असतो. सर्व धर्म त्याबद्दल वेग्वेगळ्या तर्‍हेने बोलत असतात. गेल्या काही महिन्यातल्या बातम्या बघितल्या तर हेति , चायना, मेक्सिको, ईंडोनेशिया इथले भूकंप, आताचे बंगालमधले वादळ, अमेरिकेतील वादळे, ग्लेशिअर ची मूव्हमेंट होऊन लोक मरणे, खाणीतील दुर्घटना हे सगळे काय दर्शवतात? नॆसर्गिक आपत्ती या पाठोपाठ येत आहेत आणि माणूस किती छोटा आहे हे सिद्ध करत आहेत असे वाटते. माणसाने इतकी प्रगती केली पण काही गोश्टी त्याच्या हाताबाहेर अजूनही आहेत हे जाणवते. कधी कधी वाटते निसर्ग माणसाला चॅलेंज देतो की आहे का तुमच्याकडे यावर उत्तर? कदाचित या असल्या आपत्तींमध्ये पुढील अनेक शोधांची बीजे दडली असतील.

chk this link about this volcano

6 comments:

Naniwadekar said...

"कधी कधी वाटते निसर्ग माणसाला चॅलेंज देतो की आहे का तुमच्याकडे यावर उत्तर?"
------

माधुरीबाई : किती मोठ्या प्रमाणावर काही प्राणी पूर्णपणे नष्ट होताहेत याची आकडेवारी वैज्ञानिक सतत देत असतात. यात माणसाचा हात असेलही आणि माणसाचा (म्हणजे आपल्या सगळ्यांचाच) स्वार्थीपणा भूषणावह नाही, हे खरे आहे. पण नवीन जीवप्रकार निर्माण होणे आणि ज़ुने नष्ट होणे हे प्रकार पृथ्वीवर आणि इतर ठिकाणी जीवसृष्टी असल्यास तिथेही सतत चालू असतातच. ज्या तार्‍यांचा प्रकाश आपल्यापर्यन्त पोचायलाही लाखो वर्षे लागतात इतक्या मोठ्या जगातल्या एका छोट्या ग्रहावर माणसाची वस्ती ४-५ हज़ार वर्षे असेल-नसेल. तेव्हा एकूण पसार्‍यात आपण क्षुद्र आहोत, आणि निसर्गाच्या द्‌ऋष्टीनी माणूस हा अत्यन्त नगण्य प्राणी असणार. माणसाच्या अस्तित्वाचे आणि सुखदु:खांचे महत्त्व फक्त माणसालाच आणि माणसाच्या व्यवहारांचा परिणाम ज्यांवर होतो त्या जीवमात्रांना. 'निसर्गा'साठी माणसाची किंमत शून्य आहे.

तुमची पोस्ट (नेहमीप्रमाणेच) आवडली.

MAdhuri said...

Dhanyawaad for your detail response.

Tumcha mudda barobar ahe. Shevti manus hahi ek pranich ahe.

MAdhuri

भानस said...

निसर्गापुढे आपले-माणसाचे अस्तित्वच मुळी नगण्य आहेच. तरीही त्याचा काही प्रमाणात तोल मानवाकडून बिघडवला जातोय. अशी हजारो वर्षे हेच घडत राहीले की परिणाम भयावहच दिसणार. कुठल्याही नैसर्गिक आपत्तीत माणुस पालापाचोळ्यासारखाच भिरकावला जातो... जोवर निसर्गाचे रौद्र थैमान शमत नाही तोवर हताशपणे सामोरे जाणे क्रमप्राप्त.आता हळुहळू फ्लाईटस सुरू झाल्यात.नशीबच म्हणायचे की दुसरे दोन्ही मोठ्ठे ज्वालामुखी निद्रिस्तच आहेत.

Anonymous said...

माणूस केंद्रस्थानी मानून विचार केला तर ही उलथापालथ विध्वंसक वाटते. प्रत्यक्षात ती साधारण नॆसर्गिक घटना असु शकते.

MAdhuri said...

Bhagyashree,

Kharech ahe. Asha goshti zalya ki mala nehemi watte planning kartana kahi bhag nature sathi rakhla pahije. Flights band padlya tar kevdha gondhal zala ani no other choice..........

MAdhuri

MAdhuri said...

Anonymous,

Mansala kendrasthani dharne swabhavik ahe nahi ka?

MAdhuri