दा न्हिन्सि... मशिन्स इन मोशन प्रदर्शन...
नुकतीच ह्यूस्टन येथे मैत्रिणिला भेटायला गेले होते. तिथे गेल्यावर नासा ला गेलो. नुकतेच स्पेस स्टेशन वरील स्पेस वाॅक चे प्रत्यक्ष प्रक्षेपण पाहिले होते. हे सगळे जिथून कंट्रोल केले ती कंट्रोल रूम बघितली. ट्रेनिंग फॅसिलिटी मध्ये स्पेस शटल चे भाग, सूट, रोबो, जुनी शटल्स पाहिली. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरचा लाइव्ह कार्यक्रम पाहिल्याने काही गोष्टी उगाच ओळखीच्या वाटल्या. तिथे असलेल्या प्रदर्शनात काही छान माॅडेल्स होती. चंद्रावरून दिसणारी पृथ्वी मस्त होती. लहान मुलांसाठी सायन्स मधील काही गोष्टी प्रयोग रुपात एक जण दाखवत होती. मुलांबरोबर मोठेही त्यात भाग घेत होते.



यावेळेस तिथे जाण्याचे अजून एक आकर्षण होते, ते म्हणजे तिथे असलेले लिओनार्डो दा व्हिन्सि चे मशिन्स इन मोशन प्रदर्शन. हा इटालिअन मनुष्य म्हणजे एक अजब रसायन होते. एका माणसात चित्रकार, पेंटर, शिल्पकार, शास्त्रज्ञ, कलाकार, गाणे समजणारा एवढे सगळे गुण आणि त्याने निर्माण केलेल्या कलाकृती सगळेच आपल्याला आश्चर्यात टाकणारे आणि विचार करायला लावणारे. १४५०- १५०० च्या सुमारास हा हिरा इटलीत नवीन नवीन गोष्टी करत होता. त्याचे मोनालिसा आणि द लास्ट सपर ही सगळ्यांना माहित असलेली पेंटिंग्ज. निसर्गातून प्रेरणा घेत त्याने कुतुहल जागृत ठेवत अनेक गोष्टींची कत्पना केली. या सगळ्यांची चित्र रूपात माहिती लिहून ठेवली. आजच्या काळात जी मशिनरी आपण पहातो त्याचा त्याने तेव्हा विचार केला होता. हे सगळे डावीकडून उजवीकडे लिहिले आहे व आरशात बघितल्यावर सुलटे दिसेल असे लिहिले आहे. आपण एक ओळ लिहून पाहिली तर लक्षात येते की किती अवघड प्रकार आहे ते. त्याच्या या लिखाणाला कोडेक्स म्हचले जाते. आश्चर्य म्हणजे आज ही वेगवेगळ्या संग्रहालयात बघायला मिळतात. आणि याचा मोठा भाग बिल गेटस यांनी विकत घेतला आहे व तो ठिकठिकाणी दाखवला जातो.
Vitruvian Man हे त्याचे माणसाच्या प्रमाणबद्धतेचे चित्र प्रसिद्ध आहे. तसेच अॅनाटाॅमी ची चित्रेही प्रसिद्ध आहेत.




तुमच्या जवळच्या ठिकाणी हे प्रदर्शन आले तर नक्की बघा.
1 comment:
छान लिहिता,प्रवासवर्णंन सुंदर लिहिली आहेत.धन्यवाद !
Post a Comment