काही वाचनीय..... एका तेलियाने
सध्या मराठी पुस्तके कथा, कादंबर्या यातून थोडी बाहेर पडून इतर विषयांनाही महत्व द्यायला लागली आहेत. या वर्षीच्या भारत भे्टीत जेव्हा पुस्तकांच्या दुकांनाना भेटी दिल्या तेव्हा हे प्रकर्षाने जाणवले. (आणि चांगलेही वाटले). इंग्लीश मध्ये अशी पुस्तके व सिनेमेही भरपूर आहेत. आता मराठी वाचक ही वेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांकडे आकर्षित होताना दिसत आहे.
’एका तेलियाने’ हे गिरीश कुबेर’ यांचे पुस्तक पाहिल्यावर असेच वाटले. आधी वाटले काहीतरी पेट्रोल भावांची आकोडेमोड, आणि
क्लिष्ट असे हे पुस्तक असेल पण एकदा वाचायला लागल्यावर खूप इंटरेस्टिंग आहे. वेगळ्या विषयावरचे आहे. पुस्तक आवडायचे दुसरे कारण म्हणजे आम्ही सॊदी अरेबियात काही वर्षे वास्तव्य केल्याने यातील बरीच ठिकाणे माहितीची होती, पाहिलेली होती. सॊदी लोकांच्यात राहिल्याने त्यांचे थोडेतरी स्वभावविशेष कळले होते त्यामुळॆ पुस्तक वाचताना अजून मजा आली. तिसरी गोष्ट म्हणजे यात वर्णन केलेल्या बर्याच गोष्टींची ही पिढी साक्षीदार आहे. ओपेक, तेलाचे राजकारण, गल्फ वॉर या सगळ्याशी आपला डायरेक्ट संबंध नसला तरी आपण ते सर्व बघितले आहे
सॊदी अरेबिया चा तेलमंत्री झाकी यामानी याला केंद्र्स्थानी ठेवून तेलजगतातल्या सगळ्या गोष्टींचा आढावा छान घेतला आहे. हा ’मेन तेलिया’ या पुस्तकाचा हिरो म्हणता येईल, त्याच्या बरोबर इतर देशातल्या(तेल राष्ट्रातल्या) महत्वाच्या लोकांचीही छान माहिती दिली आहे. अमेरिकेची अरेरावी, त्याला प्रत्युत्तर देऊन यामानी ने केलेली देशाची भरभराट यात दाखवली आहे. सगळा तेलाच्या राजकारणाचा इतिहास आपल्यापुढे उभा केला आहे. ऒपेक ची स्थापना, तेलदर व त्याचे राजकारण, वेळोवेळी चाललेल्या लढाया, रशियाचा शिरकाव न होऊ देण्याचे अमेरिकेचे प्रयत्न, सगळ्या राष्ट्रांना एकत्र ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न हे सगळे यात चांगले मांडले आहे.ऒपेक च्या सदस्यांच्या अपहरणाचा प्रसंग अतिशय नाट्यपूर्ण लिहिला आहे. यामानीला देशातील अडाणी लोक व परकिय चलाख लोक या दोघांशीही एकदम लढा द्यावा लागला. तो मुळात शिकलेला असल्याने दूरवरचे पाहू शकत होता. हे पुस्तक वाचल्यावर एक मात्र पटते, नुसता राजा चांगला असून भागत नाही , मंत्रीही चांगलेच निवडावे लागतात तरच देश पुढे जाऊ शकतो. किंग फॆजल ने सॊदी मध्ये सुधारणा करताना किती कष्ट घेतले ते छान सांगितले आहे. सतत मुल्ला मॊलवींचा विरोध. परत धर्माची आडकाठी होच सुधारणा करताना.
मी यातल्या महत्वाच्या घटना साधारण क्रमानुसार माडून ठेवल्या आहेत. त्यावर नजर टाकली तर सगळा इतिहास डोळ्यापुढे उभा राहिल. जोडीला मिडल इस्ट चा नकाशा ही टाकला आहे.
१९१८ - व्हेनेझुएला -गोमेझ यांनी तेल विकून कर्ज फेडले, पायाभूत सुविधा आणल्या
१९३२ - सॊद तर्फे सॊदी अरेबिया नामकरण
१९३३- अमेरिकन कंपनी सोकॅलला प्रथम तेल खोदकामाचे हक्क
१९३७ - समाधानकारक तेल मिळू लागले
१९४४ - अरॅम्को ची स्थापना - सॊदीला पॆसा मिळावा म्हणून
१९५१ - इराण - महंमद मोसादेघ - प्रथम तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले
१९५९ - व्हेनेझुएलाचे पेरेझ व सॊदी मंत्री तारिक एकत्र येउन - ऒपेक चा जन्म
१९५६ - लिबियात तेल साठे मिळायला लागले. सुवेझ च्या दुसर्या बाजूला असल्याने महत्व
१९५७ - किंग फॆजल बरोबर यामानी यांची कामाला सुरूवात
१९५८ - इजिप्त व सॊदी मध्ये मॆत्री - झेककडून शस्त्र खरेदी
सिरियाचा हल्ला, सॊदीला खर्च नियंत्रण गरजेचे
बिन लादेन च्या वडीलांची मदत
१९६२ - झाकी यामानी ३२ व्या वर्षी तेलमंत्री, पेट्रोमिन ची स्थापना, युनिव्हर्सटिची स्थापना, रूमानियाबरोबर धान्यकरार
१९६७ - इस्त्रायल विरूद्ध इजिप्त,जॉर्डन, सिरिया इराक ६ दिवसांचे युद्ध, अमेरिका विरोधाची लाट, तेलाचा कोट ठरविण्यासाठी ओआपेक
ची स्थापना
१९६९ - गडाफी नी भाववाढ सुरू केली. यामानींची मदत घेऊन ऒक्सी कंपनी वर बंदी व इतर कंपन्याही दबावाखाली आणल्या
१९७१ - प्रत्येक देशाशी वेगळ्या दराचा करार. लिबियाचा जास्त फायदा.
१९७३- बायबॅक तेलाचा रेट वाढवला. तेलाचे भाव खूप वाढवले. अमेरिका इस्त्रायलच्या बाजूने तर रशिया इजिप्त सिरियाच्या बाजूने तेलकंपन्यावर बहिष्कार शेअर बाजार कोसळले, मंदी, १६ दिवसांचे युद्ध इजिप्त इस्त्रायल करार होऊन युद्ध संपले.
१९७५ - सॊदी राजाची हत्या, कार्लोस चे अपहरण नाट्य
१९७८ - खोमेनी शहा विरोध, अरॅम्को बद्दल माहिती ला नकार
१९८० - इराक इराण युद्ध अतोनात तेल भाववाढ सॊदीत अतोनात पॆसा
१९९० - इराक कुवेत युद्ध. कुवेतसाठी अमेरिकन फॊजांना सॊदी भूमीवर परवानगी, सॊदीत असंतोष, अल काईदाचा जन्म