फुलांचे पण टाईम टेबल असते.....
अमेरिकेत आल्यावर बागकाम हा माझा आवडता उद्योग परत सुरू झाला. वेळ भरपूर आणि मातीची आवड त्यामुळे बागेत बराच वेळ मी घालवते. इथे ज्या भागात बर्फ़ पडते तिथे ४ महिने बाग करता येते. जिथे ट्रॉपिकल हवा आहे तिथे भारतासारखे सगळे दिवस बाग फुलवता येते.
आम्ही सुरूवातीला अपार्ट्मेंट मध्ये रहात होतो तेव्हा छोट्याश्य़ा बाल्कनीत २-४ कुंड्या आल्या. अर्थात गुलाब ही बहुतेक भारतीयांची पहिली पसंती असते त्यानुसार मी पण गुलाबाने सुरूवात केली. बाकी बरीच झाडे अनोळखी होती. सगळीच झाडे फुलांनी अगदी डवरलेली दिसत. मला वाटते वर्षाचे १२ महिने मिळत नाहीत फुलायला त्यामुळे संधी मिळाली की अगदी भरपूर फुलतात ही झाडे. आम्ही मिडवेस्ट मध्ये रहातो त्यामुळे तसे ४ महिनेच मिळतात बाग फुलवायला. स्प्रिंग च्या सुरूवातीला सगळ्या नर्सरी मध्ये फुलांचे ताटवे दिसायला लागतात. त्याची तयारी १-२ महिने आधीच चालू असते. छोट्या ट्रेज मध्ये रोपे बनवतात. सगळे कसे शिस्तीत असते. झाडांना माती व खत यांचे बरोबर मिश्रण घातलेले असते. आपल्याकडची गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, अनंत ही फुले दिसतात. गरम भागात चाफा, कण्हेर, जाई ही बघायला मिळतात. बाकी सगळी नवीन फुले बघायला मिळाली आणि हो लावायला पण मिळाली.
घर घेतल्यावर बरीच झाडे लावण्याची माझी हॊस भागली. ऑक्टोबर नंतर बाग हळूह्ळू वाळायला लागते. अगदी काड्या दिसतात. पानांचा पत्ता नसतो. त्यापॆकी काही झाडे पुन्हा मार्च मध्ये येतात (पेरिनिअल). ते बघायला खूप मजा येते. अगदी वाळलेली बाग पुन्हा जिवंत होऊन आपल्यासमोर येते. सुरूवातीला मी त्या झाडंचे खूप निरीक्षण केले. पहिल्या वर्षी प्रत्यक्ष बघेपर्यंत विश्वास बसला नव्हता. आता मात्र झाडे लावताना पेरिनिअल जास्त लावली जातात कारण ती पुन्हा पुन्हा येतात. २-३ वर्षे गेल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली, या फुलांचे पण टाईमटेबल आहे. ठराविक दिवसात ठराविक फुले येतात. हवेनी मनमानी केली तर एखादा आठवडा पुढे मागे पण ही फुले ठराविक वेळेलाच येतात व ठराविक वेळच टिकतात.
सुरूवातीला माझ्या बागकामावर घरात बरीच चर्चा होत असे पण आता सगळेच वाट बघतात. दर वर्षी फुलुन पुनःप्रत्ययाचा आनंद देणार्या या फुलांची मी आभारी आहे. आणि हो आता गुलाब, मोगरा यांच्याबरोबरीने ही फुलेही मला ’आपलीच’ वाटतात. अशाच काही माझ्या बागेतल्या फुलांचा हा पुष्प्गुच्छ.
Month of April
(daffodils, Tulips, lily of valley)
.
.
Month of May( Iris, Rhododendron, clementis, Peonies)
.........
.......... 
.
.
................................
Peonies Memorial day weekend
Month of June July and August(Lily, Salvia, Hibiscus,
Pitunia, Rose and Mogra)
.
..
...
..
.
Month of July August September( mums, plumeria (from HAwaii)
gardenia .....)
.........
.
.
.......
and many more....

No comments:
Post a Comment